Sunday, February 9, 2014

हरिश्चंद्र गडावर जाताना….

     मी आणि माझे मित्र सतत कुठे ना कुठे भटकंती ला जात असतो, असेच कॉलेज च्या कट्ट्यावर बसलेले असताना विषय निघाला चला कुठेतरी फिरायला जाऊया, आत्ता फिरायला जायचं म्हटल्यावर सर्वांच एकमत होण जरा कठीणच असते. बर्याच वेळच्या वाद-विवाद नंतर शेवटी सर्वांचे एकमत झाले कि आपण हरिचंद्र गडावर ट्रेकिंग ला जायचं.
     तर आम्ही आठ मित्र सर्वांनी ठरविले सकाळी लवकर चार दुचाकी घेऊन निघायचं. आमच्यातले सार्वजन या आधी पण कुठे न कुठे ट्रेकिंग साठी गेलेले होते पण ओवर नाईट ट्रेकिंग गेलेले चार-पाच जन होते.
हरिश्चद्र गडावर गेलेला फक्त एकजण तो म्हणजे अक्षय, तोही इयता आठवी मध्ये, बर सांगण्या सारखी गोष्ट म्हणजे आम्ही ज्या काट्यावर बसून हा प्लान केला, तो कट्टा होता फेर्गुसन कॉलेजचा आणि ज्या ईयातेत आम्ही शिकत होतो ती इयता होती सतरावी म्हणजे आम्ही आमच्या Post Graduation ला होतो.
    नेहमी कुठेतरी जायचं म्हटलं कि सगळी प्लानिंग मला, अक्षय आणि दिपेश ला करावी लागायची कारण सगळ्यात जास्त नाईट ट्रेक केलेला आम्ही तिघेच होतो. आम्हाला ट्रेक वर जाताना कुठल्या गोष्टीची गरज असते याची चांगलीच माहिती होती. सर्वांनी मला सर्व वस्तूची यादी तयार करून इमेल करायला सांगितले. मग मी आणि अक्षय लागलो यादी तयार करायला.
    आम्ही दोघांनी मिळून सर्व आवशक वस्तूची यादी केली. ऊदा. प्रत्येकाकडे ३-४ लिटर पाणी, टोर्च, रस्सी, स्पोर्ट शूज, फर्स्ट-एड बोक्स, काठी, ग्लुकोज पाउडर, छोटा चाकू, अंथरून - पांघरून इत्यादी.
हा ट्रेक ओवर नाईट होता त्यामुळे तिथे जाऊन काहीतरी स्वतः बनवुन खायचा बेत आम्ही केला. तर ठरलं कि आपण खिचडी करायची आणि खायचं, त्यासाठीचा मसाला व इतर साहित्य दिपेश आणि निखिल ला यादी करून घेण्यासाठी सांगितले. खिचडी करण्यासाठी चे साहित्य रॉकेल, पातेलं, तांदूळ, बटाटा इत्यादी सगळ्यांनी विभागून आणायचं ठरलं. विशेष म्हणजे चहा करून पिण्यासाठीचे साहित्यही घेतले.
    सर्व तयारी केली आणि २८ ऑक्टोबर च्या सकाळी ६. ०० वाजता मी, अक्षय ठरल्याप्रमाणे निखिल च्या रूम वर भेटलो, फक्त अनंत वेळेवर नाही आला. बाकीची मंडळी संतोष, दिपेश, विठ्ठल, प्रताप नाशिक फाटा इथे आमची वाट पाहत होते. शेवटी अनंत ९. ०० ला आला, आम्ही खास शैलीत त्याचे स्वागत केले. आम्हाला चौघांना नाशिक फाट्यावर पोहचायला ९. ३० ते १०.३० वाजले. तिथे पोहोचल्यावर परत अनंत्रावाचे स्वागत खास शैलीत झाले.
    हुश !!! आणि ११ च्या दरम्यान आमचा प्रवास हरिश्चद्र गडाच्या दिशेने चालू झाला. चार दुचाकी आणि आम्ही आठ जण, आमचा मार्ग आधीच आम्ही ठरवलेला नाशिक फाटा - नारायणगाव -आळेफाटा -ओतूर - पिंपळगाव धरण (कल्याण - नगर रस्ता ) - खिरेश्वर - हरिश्चंद्र गड एकूण १९० ते १९५ किमी. रसत्याने जाताना राजगुरुनगर च्या आधी मस्त पैकी मनसोक्त मिसळ-पाव खाल्ला, मिसळीची चव मात्रा झकास होती. मिसळ खून १२ - १२.३० ला आम्ही पुढच्या दिशेने निघालो.
२ - २.३० ला आम्ही नारायणगाव ला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर मात्र आम्ही आमच्या ठरलेल्या मार्गात बदल केला आणि नवीन मार्गाने म्हणजे जुन्नर - (जुन्नर - कल्याण रस्ता गणेशखिंड मार्गे ) - पिंपळगाव धरण - खिरेश्वर - हरिश्चंद्र गड, तासाभराने आम्ही जुन्नर ला पोहोचलो आणि तिथे ठरल्या प्रमाणे लिंबू, कोथिंबीर आदी घेतले. अर्थाथ आम्ही ठरविले होते वाटेत घायचे कारण हे पोहचे पर्यंत ताजे राहील म्हणून.
    ह्या प्रवासातील अविस्मरणीय वेळ म्हणजे (जुन्नर - कल्याण रस्ता गणेशखिंड मार्गे ) हा रस्ता डोंगर-घाटातून जाणारा, रस्ताच्या दोन्ही बाजूस विलोभनीय हिरवळ पसरली होती, आम्हाला तिथे थांबून फोटो काढण्याचा मोह आवरता नाही आला, अर्ध्या तासाच्या विश्रांति नंतर पुढचा प्रवास सुरु केला. आम्हाला पिंपळगाव धरणा वरून खिरेश्वर ला जायचं एवढ माहिती होते एक-दीड तसाच्या रायडींग नंतर ४.३० च्या आसपास खिरेश्वर ला पोहोचलो.
    तिथे पोहचल्यावर एका स्थानिकाच्या घरी सर्व दुचाकी लावल्या, आणि हरिचंद्र च्या दिशेने पायी निघालो. वाटेत रसत्या च्या बाजूला असलेल्या विहिरी वर फ्रेश झालो. जाताना दोन-तीन ट्रेकेर ग्रूप परत येताना दिसले, बगलेत रस्सी, पायात स्पोर्ट शूज, आणि थकलेले चहरे, त्यांचा चेहरा सांगत होता आम्हाला कशाशी तोंड द्यायचं आहे. मित्र पुढे चालत होते मी मागे-मागे चालत होतो पुढे गेल्यावर दोन पाउल वाटा होत्या मित्रांनी डावीकडचा रस्ता घेतला, पुढे १० मिनिट चालत रहिल्यानंतर पुढे नदी चा रस्ता लागला, सगळ्यात पुढे संतोष, प्रताप आणि त्याच्या मागे आम्ही सगळे मी सगळ्यात मागे, घनदाट झाडी आणि संध्याकाळी ५ चा प्रकाश मला मनात वाटत होते की, आपण रस्ता चुकलो पण कोणालाच रस्ता नीटसा माहित नव्हता, आमच्या पैकी अक्षय एकटा म्हणत होता मला रस्ता माहित आहे, पण तोही चार - पाच वर्ष आधी इथे आलेला त्यामुळे तोही खात्रीशीर सांगू शकत नव्हता, पुढे ठीकासा रस्ता किंवा पाऊल वाट न दिसल्याने मी म्हणालो आपण बहुतेक रस्ता चुकलोय, प्रत्येकाला त्याची जाणीव झाली, आणि आम्ही परत फिरलो. आणि ज्या ठिकाणी आम्ही डावीकडे वळण घेतले होते तिथून उजवीकडचा रस्ता घेऊन चालायला लागलो. रस्ता चुकल्याने आमचा बराच वेळ वाया गेला. ज्या मुळे माझे जरा धैर्य खचले आणि सुर्य पण मावळती कडे निघाल्यामुळे त्यात आणखीन भर पडली.
    त्यातच धीराची गोष्ट म्हणजे रसत्यात खाली उतरणारे काही ट्रेकर्स भेटले, आणि आपण बरोबर वाटेवर आहोत याची खात्री पटली. १०-१५ मिनिटांनी आम्ही घनदाट हरीचाद्राच्या जंगलातून चालायला लागलो. तसा रस्ता कड्या-खापऱ्या असल्याने मला चढण्यास कठीण वाटत होता, पण माझे मित्र मला धीर देत होते आणि मला चालवत होते. काही वेळाने मी आपण डब्बा खाऊन पुढचा रस्ता चढू म्हणालो, मित्रांनी पण माझे म्हणणे एकले आणि मी माझा डब्बा झटक्यात काडला आणि तेवढ्याच वेगाने तो आम्ही संपवला, संतोष आणि निखिल मात्र नाही खाल्ले. डब्बा खाल्ल्या नंतर मला जरा उत्साह आला आणि आम्ही सगळे वेगाने पुढे निघालो.
   वाटेत आम्हाला दोन-तीन वेळा स्थानिक सुद्धा भेटले, डोक्यावरती जळण-फाटा घेतलेले. मी त्यातल्या एकाला विचारले "गड अजून किती लांब आहे?", उत्तर मिळाले, "अजून बरंच लांब आहे", मी अजून जोरानं चालायला लागलो.
आम्ही सोबत ग्लुकोज पाणी घेतले होते, थोड्या - थोड्या वेळाने आम्ही ते प्यायचो, प्रताप तर पूर्ण ग्लुकोज चे पाकेट घशात ओतत होता. काही वेळाने वाटेतील सगळ्यात कठीण चढण चढले, आणि धीरात - धीर आला. चढताच समोर एक गोठा दिसला, १० मिनिटांच्या विश्रांती नंतर पुढे चालायला लागलो, तेवढयात वाटेतला सगळ्यात कठीण प्रसंग घडला, तो म्हणजे अक्षय अचानक किंचाळून जागेतच खाली बसला. मी सगळ्यात मागे होतो धावत - धावत मी त्याच्याजवळ पोहोचलो तर, पहिले प्रताप त्याची पिंडरी चोळत होता, आणि अक्षय किंचाळत होता, माझी "पिंडरी फिरली'", आधीच माझे हात - पाय थर-थर करत होते आणि त्यात अक्षय किंचाळत होता. थोडा वेळ संतोष आणि विठ्ठल नी त्याचा पाय चांगला स्ट्रेच केला मग त्याला थोड रिलीफ वतले, आणि तो चालू लागला, त्याच दरम्यान माझ्या मनात अनेक विचार येऊन थैमान घालत होते. अक्षयचा पाय नसता बरा झाला असता तर ? …आमच्यावर इकडे आड तिकडे विहीर असा प्रसंग ओढवला असता. पण सुदैवाने असे काही झाले नाही.
थोडे पुढे चालत राहिल्यानंतर आम्हाला एक ३ जणांचा ट्रेकर ग्रूप दिसला, सगळे ५०-५५ च्या पुढचे त्यात पण एक महिला अक्षयने त्यांना विचारले, "गड अजून किती दूर आहे ?", त्यातल्या एकाने उत्तर दिले "अजून तास - दीड तास तरी लागेल", त्याच वेळी त्यांनी आम्हाला एक मोलाचा सल्ला पण दिला "फक्त डोंगर तुमच्या डाव्या हाताला ठेवून चालत रहा गड येईल." त्यांचा सल्ला ऐकून आणि त्यांचा उत्साह पाहून आम्हाला पण उत्साह आला.
    पुढे १०-१५ मिनिटे चालत राहिल्या नंतर अंधार झाला आणि आम्ही आमच्या टोर्च काडल्या आणि सगळे सोबत चालायला लागलो. झाडातून किरर्र असा रात किड्यांचा आवाज येत होता. आम्ही काठ्यांचा आवाज करत, गाणी गात पुढे जात होतो. आम्ही सोबतीला काजू-बदाम पण घेतले होते ते खात होतो आणि पुढे चालत होतो, ती रात पुनवेची होती त्यामुळे चंद्राचा लख्ख प्रकाश सर्वत्र पसरला होता.
    आणि आम्ही सगळ्यांनी एक दीर्घ श्वाश घेतला कारण गडावरच्या मंदिरावरची लाईट दिसली, आम्ही जराही विलंब न करता झपाट्याने चालायला लागलो. गडावर पोहोचल्यावर तेथील स्थानिकाने "तुम्हाला काही हवे आहे का?" विचारले, आम्ही काहीही नको असं म्हणत, गुहा कुठे आहे? विचारले, त्यांनी गुहेकडे बोट करून दाखविले, आम्ही झटक्यात गुहा गाठली आणि पाठीवरचे ओझे खाली जमिनीवर टाकले आणि नि:श्वाश सोडला.
    आम्ही पोहचलो तेव्हा ८-८.३० वाजले असतील, लगेच आम्ही पुढच्या कामाला लागलो ते म्हणजे शेकोटी साठी लाकडं जमविण्याच्या, त्यासाठी आम्हाला जास्त महिनत घ्यावी लागली नाही, कारण आमच्या आधीच्या ट्रेकर्सनी आमच्यासाठी भरपूर लाकडं मागे सोडले होते, आम्ही शेकोटी केली. आम्ही जुन्नर मध्ये थांबून चिकन पण घेतले होते मस्त भाजून खाण्यासाठी आणि पेटवलेल्या शेकोटी वर ते भाजून घेण्यास सुरुवात केली. पण एक घोडचूक म्हणजे गुहेच्या आत एक छोटा खड्डा होता त्यात शेकोटी केली होती त्याने संपूर्ण गुहेमध्ये धूर झाला, आणि सगळ्याच्या डोळ्यात पाणी आणि सगळे खोकालायला लागलो. कसेबसे चिकन भाजून घेतले आणि शेकोटी विझविली, नंतर गुहेच्या बाहेर शेकोटी पेटविली.
    तसं गुहा ऐसपैस आणि मोठी होती, सर्वांनी जेवणाचे डब्बे काडले आणि मस्त पंगत टाकली. आमच्यापैकी काहीजण चिकन न खाणारे पण होते त्यांनी आणलेल्या डब्बा कडून ताव मारायला सुरवात केली. भाजलेले चिकन उत्तम लागत होते.
जेवण झाल्यानंतर सगळे जण झोपण्याच्या तयारी ला लागलो, सगळ्यांनी सोबत आणलेले अंथरूण टाकले, दरम्यान संतोषनी गुहेच्या दाराशी काठ्या आडव्या लावून घेतल्या, गुहेला दोन खिडक्या पण होत्या तिथे त्याने पाण्याच्या बाटल्या लाईनशीर लावल्या, जेणेकरून गुहेमध्ये कोणी आले तर आम्हाला कळावे. सगळेजण एवढे थकले होते कि लगेच सगळे झोपी गेले, मला मात्रा नवीन ठिकाणी झोप सहजा-सहजी लागत नव्हती, त्यात अक्षय इतका घोरत होता कि सगळ्या गुहेत आवाज घुमत होता, थोड्या वेळानी मला पण झोप लागली.
    एक मजेशीर गोष्ट म्हणजे त्या रात्री एक किस्सा घडला, रात्रीचे तीन वाजले असावेत तेवढ्यात कसल्यातरी आवाजाने मला जाग आली, आणि पहिले तर अनंत गुहेमध्ये एकटाच फिरत होता बहुतेक काहीतरी शोधत होता, मी विचारले "काय झाले रे?", म्हणाला "तहान लागली आहे." संतोषने सगळ्या पाण्यच्या बाटल्या एका बाजूला ठेवल्या होत्या, त्यातली एक बाटली त्याने तोंडाला लावली आणि धावत गुहेच्या दारा जवळ जाऊन सगळे पाणी थुंकून टाकले, मी ताडकन उठून बसलो आणि विचारले "काय झाले रे ?", म्हणाला "मी रॉकेल पिले", मी हसायला लागलो, मग त्याने दुसरी बाटली घेऊन तोंडाला लावली, ती पण त्याने थुंकून टाकली, मी परत विचारले, "आता काय झाल?", म्हणाला "मी sprite पिले.", मी परत हसायला लागलो आणि उठून त्याला पाणी शोधण्यात मदत केली, तेवढ्यात दिपेश पण उठला आम्ही तिघे पण गुहेच्या बाहेर जाऊन शेकोटी पेटविली, आणि गप्पा मारत बसलो, थोड्यावेळाने मला झोप येत होती म्हणून मी मध्ये येउन झोपलो.
   सकाळी मी गुहेच्या आजूबाजूला नजर टाकली, समोरच शंकरचे मंदिर होते तिथे मी पूजेची लगबग पहिली चार-पाच ओल्या कपड्या मध्ये मंदिराच्या प्रदक्षणा करत होते आणि मंदिराचा कळस सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये चमकत होता. आमच्या गुहेच्या बाजूच्या गुहेत एक कुटुंब राहाला होते ते पाहून मला जरा आश्चर्य वाटले, तेथील महिलेने मला "नाष्ट्या साठी काही करून देऊ का?", असे विचारले. मी नकारार्थी मान हलविली.
   सकाळी सगळ्यांनी आपले विधी करून घेतले, आणि मस्त पैकी चहा करून पिला जरी त्या चहाला घरची चव नसली तरी, चहा मस्त लागत होता थोड्या वेळच्या फोटो सेशन नंतर मी, प्रताप, अक्षय आणि दिपेश आंघोळी साठी मंदिराजवळ पाण्याचे टाके होते तिथे गेलो, सकाळी थंड पाण्याची अंघोळ काय असते याचा अनुभव घेतला.
अंघोळी नंतर मंदिराच्या बाजूला एका गुहेमध्ये पाण्यातील शंकरची पिंड पहिली, आकाराने अतिशय मोठी आणि छाती इतक्या पाण्यामध्ये, प्रताप म्हणाला "चला पाण्यामध्ये जाऊन दर्शन घेऊ !", आम्ही तिघांनी नको जायला पाण्यामध्ये काहीही असू शकते असं म्हणालो, पण ऐकेल तो प्रताप कसला आमची खिल्ली उडवून तो एकटाच पाण्यामध्ये उतरून पिंडीला एक प्रदिक्षणा घालून आला, आणि आम्हाला पाण्यात उतरण्याचे आव्हान केले. धीर करून आम्ही ते स्वीकारले आणि आम्ही तिघे पण त्या थंडगार पाण्यामध्ये उतरून दर्शन घेऊन आलो, पण लगेच आम्हा सगळ्यांना वाटले कि असे पाण्यचा अंदाज न घेता पाण्यात उतरणे चुकीचे होते.
   परत गुहेकडे जाताना, अक्षय आपले अंग खाजवू लागला पाहता-पाहता त्याच्या कमरेच्या खालच्या भागावर मोठे-मोठे फोड यायला लागले, आम्हाला काहीच कळेना काय झाले आहे, संतोष, निखिल, अनंत आणि विठ्ठल पण अंघोळी साठी आले होते, संतोष म्हणाला "तुळस शोधून अंगाला लाव !", मी म्हणालो "अहो, तांबे गुरुजी आता गडावर तुळश कुठ शोधायची ?", ह्या वाक्यावर सगळे जन हसायला लागले. अक्षय ला आम्ही सगळ्यांनी, "अरे तुला कशाची तरी reaction झाली आहे, होईल अपोआप नीट !" असे म्हणून धीर दिला.

   सकाळचे ९-९.३० वाजले होते, अंघोळी नंतर आम्ही वेळ न घालवता मी, दिपेश आणि अक्षय खिचडी बनवण्याच्या तयरी ला लागलो, सोबत आणलेले सगळे साहित्य एकत्र करून घेतले आणि मस्त पैकी खिचडी ची फोडणी मारली आणि खिचडी शिजविण्यासाठी ठेवली. तेवढ्यात अनंत, संतोष… अंघोळ करून आले. खिचडी शिजे पर्यंत सगळ्यांनी आपापल्या bags आवरल्या, आणि सगळ्यांनी खिचडी वर ताव मारला.
   खिचडी खाऊन झाल्यानंतर आपण विंचू कडा पाहायला जायचं ठरलं. सगळी आपापली आवारा-अवर करत होते, तेव्हा संतोष नी संपूर्ण गुहा स्वच्छ झाडून घेतली, पण आमच्यातले काहीजण म्हणत होते, "राहू दे!, कशाला झाडून काडतो ?", काहीजण संत गाडगे बाबा म्हणून खिल्ली उडवत होते, पण तो कोणाचेच ऐकत नव्हता, त्यांनी सगळी गुहा स्वच्छ करूनच श्वाश घेतला. आम्ही जरी त्याची खिल्ली उडवत होतो, पण प्रत्येकाला आतून त्याचा अभिमान वाटत होता.
१०-१०.३० ला आम्ही सगळे विंचू कड्याच्या दिशेने चालू लागलो, तसा भराच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोहचलो, आणि समोरचे दृश्य पाहून वाटले आपला ट्रेक सार्थ झाला, इतके विलोभनीय दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटले, क्षण भर वाटले हा क्षण कधीच आपल्या आयुष्यातून जाऊ नये.
   थोड्या वेळच्या विश्रांती नंतर, १२-१२.३० आसपास आम्ही परतीचा प्रवाश सुरु केला आणि जवळ-जवळ ४.३० ला आम्ही खिरेश्वर ला पोहोचलो.
   एकंदर संपूर्ण ट्रेक चा अनुभव मस्त होता, प्रवासातील काही क्षण-प्रसंग आजही आठवून आम्ही हसत असतो, आणि शेवटी मी एवढेच सांगेन जर कोणी असा ट्रेक प्लान करत असेल तर आपले वेळापत्रक काटेकोर पणे पाळा, सोबत कोणीतरी अनुभवी व्यक्ती असावी, जरी नसेल तर एखाद्या स्थानिकाची मदत घ्या. आयुष्यात प्रत्येकाने असा ट्रेक जरूर करावा, अर्थाथ माझ्या सारख्या युवकांनी तर जरूर करावा.
   "वेळेवर निघा, सुरक्षित पोहोचा आणि निसर्गाचा आनंद घ्या."